
केंद्रशासनाच्या वतीने जि.प.च्या १०३ आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार.
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार्या सन २०२३-२०२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या कायाकल्प पुरस्कारात रत्नागिरी जिल्ह्याने छाप पाडली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात १०३ शासकीय आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार्या २०२३-२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील २ उपजिल्हा रूग्णालय, २ ग्रामीण रूग्णालयासह २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ७६ आरोग्य उपकेंद्रांनी हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच कौतूक केले आहे. www.konkantoday.com