
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड १९ तपासणी लॅब पडवे येथील एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये सुरु
इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्चची मान्यता असलेली खासगी तत्त्वावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कोविड १९ तपासणी लॅब पडवे येथील एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये काल पासून कार्यान्वित झाली. येथील ट्रनाईट स्वॅब टेस्टिंग लॅबचे आमदार नितेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या लॅब मधून केवळ दीड तासांत कोरोना तपासणीचे रिपोर्ट उपलब्ध होणार आहेत.त्यासाठी आयसीएमआरच्या निर्देशानुसार फक्त २८०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.एका दिवसांत २४ स्वाबची तपासणी येथे केली जाईल, अशी माहिती आ. नितेश राणे आणि लाईफटाईमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
www.konkantoday.com