
विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल, ऍसिडच्या गळतीने भातशेतीचे नुकसान
महावितरण कंपनीच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून सुरू असलेल्या ऑईल, ऍसिडच्या गळतीने आरवली गुरववाडीतील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आरवली-कुंभारखाणी रस्त्यालगत गुरववाडीतील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेले काही महिने नादुरूस्त झाला असून त्यातून ऑईल, ऍसिडची गळती सुरू झाली आहे. आरवली गुरववाडीतील शेतकर्यांनी याची माहिती महावितरणच्या अधिकार्यांना दिली होती. तरीही ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती, बदलणे यापैकी एकही पर्याय महावितरणने न स्विकारल्याने लावणी झालेली भातरोपे जळून गेली आहेत.
www.konkantoday.com