लॉकडाऊनमुळे घरगुती वीज ग्राहकांनी बिले न भरल्यामुळे महावितरणची थकबाकी वाढली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेले तीन महिने संपूर्ण बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाल्यामुळे आर्थिक व्यवहार थांडावले होते. त्यातच वीज महामंडळाने तीन महिन्याची बिले एकत्र वीज ग्राहकांना पाठविल्यामुळे वीज ग्राहकांच्यात नाराजी निर्माण झाली होती. ही बिले वाढीव आल्याची वीजग्राहकांची भूमिका होती. मात्र महावितरणने ही बिले बरोबर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही ही बिले वीज ग्राहकांनी अद्यापही भरली नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणची थकबाकीत वाढ झाली असून जवळजवळ ७२ कोटी ४५ लाख रुपये थकबाकी झाली असून त्यामध्ये घरगुती ग्राहकांसह औद्योगिक ग्राहक, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषि पंप आदींचाही समावेश आहे. जिल्ह्यात ३२ हजार ३६० ग्राहकांकडून ४४ कोटी २४ लाख रुपये थकबाकी आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ६ कोटी ४३ लाख, वाणिज्य विभागातील ग्राहकांकडून ८ कोटी, औद्योगिक ग्राहकांकडून ५ कोटी १२ लाख अशा वेगवेगळ्या ग्राहकांकडून महावितरणाला थकबाकीपोटी ७२ कोटी ४५ लाख रुपये येणे असून ही वसुली कशी वसुल करावयाची याची चिंता महावितरणला पडली आहे.
www.konkantoday.com