रत्नागिरी जिल्ह्यात 89 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1049,ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 360

रत्नागिरी दि. 15 (जिमाका): आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 655 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये घरडा येथून 1, जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 4, कोव्हीड केअर सेंटर, पेढांबे येथून 13 आणि 3 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे

रत्नागिरी 13

कळबणी 17

घरडा, खेड 20

संगमेश्वर 3

कामथे 19

गुहागर 10

दापोली 7 आडे, दापोली येथील 62 वर्षीय महिला कोरोना रुग्णांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता 34 झाली आहे.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 1049

बरे झालेले – 655

मृत्यू – 34

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 360

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 80ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोली मध्ये 10 गावांमध्ये, खेड मध्ये 21 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 आणि राजापूर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 73, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 7, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 6, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 2, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 8, ग्रामीण रुग्णालय गुहागर-1, केकेव्ही, दापोली – 16 असे एकूण 114 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 10 हजार 491 इतकी आहे.
11 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 12 हजार 864 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 12 हजार 414 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1049 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 11 हजार 442 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 350 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 15 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button