
यावेळी कुठल्याही ग्राहकाची वीज कापली जाणार नाही- अनिल परब
लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे वीज वितरण कंपनीने बंद केले होते. त्यामुळे सरासरीच्या 10% बिल ग्राहकांना ऑनलाइन पाठवण्यात येत होते. जून महिन्यात रिडिंग घेऊन ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. मात्र, हे बिल बघून ग्राहक चक्रावले आहेत. महिन्याला साधारणतः ५०० ते ७०० रुपये बिल येणाऱ्या लोकांना ३ महिन्याचे साडेतीन हजार ते चार हजार रुपये आले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना खाण्याचा प्रश्नाला समोरे जावे लागतेय. यातच हजारो रुपये कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना पडलाय.
मात्र, आता एक दिलासादायक वृत्त आहे. अनिल परब यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली.दोघांमध्ये वाढीव वीज बिलाच्या तक्रारींबाबत चर्चा झाली. त्यांच्या चर्चेनंतर अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कुठल्याही ग्राहकाची वीज कापली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं. ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात दिलासा मिळेल. ज्यांना वीजबिल जास्त आलं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाई, असं अनिल परब म्हणाले.
www.konkantoday.com