
बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतीकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या चार महिन्यांत आपण सर्वधर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतीकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्यावर सर्वांचे एकमत झाले
बकरी ईदसंदर्भात मंगळवारी आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनीदेखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही ग,
र्दी न करता साजरी करावी, असे आवाहन यावेळी केले.
www.konkantoday.com