दाभोळ-दापोली एसटी व दुचाकी याच्यातील भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू

दापोली 🙁 वार्ताहर )दापोली दाभोळ रोडवर वळणे येथील वाकणात एसटी व दुचाकी स्वार यांच्यात दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला या मध्ये आई व मुलगा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार दुपारी एक वा.तीस मिनिटांनी दाभोळ येथून सुटणा-या दाभोळ-दापोली एस.टी.ला दुपारी अडीच चे सुमारास वळणे कॅश्यू फॅक्टरी नजिक दोन दुचाकी ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बस वर आदळून अपघात झाल्याचे दापोली आगारातील सूत्रांनी कळविले. सदर गाडीवर साळुंखे हे चालक तर देवघरे हे वाहक म्हणून होते
या भीषण अपघातात वळणे गावातील रहिवासी मीनाक्षी मंगेश बोरजे वय 40आणि आकाश मंगेश बोरजे वय 22 हे जागीच मृत्यू पावले. तर देवके येथील बाईकस्वार निलेश व विलास गोरीवले हे गंभिर जखमी झाले आहेत. त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयातजखमींवर उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button