
कोकणातील गणेशोत्सवावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोकणातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची घेतली बैठक
गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी या कालावधीत कोकणात जाण्यासाठी मुंबईकर चाकरमानी अधीर झाला आहे.चाकरमान्यांना आता आणखी थोडा धीर धरावा लागणार आहे. कारण परवानगी मिळण्याची शक्यता असली तरी बस, ई-पास, क्वारंटाइनचा कालावधी, वैद्यकीय सुविधा यांचाही विचार करावा लागणार आहे. मंगळवारी त्या संदर्भातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोकणातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेचा तपशील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे परब यांनी सांगितले.
या बैठकीतील लोकप्रतिनिधींची मते व प्रशासनाची भूमिका याचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. मग त्या अनुषंगाने चाकरमान्यांचा प्रवास व इतर गोष्टींवर चर्चा होऊनकोकणात गेल्यावर चाकरमान्यांना किती दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल या प्रश्नावर उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, आयसीएमआर व आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे तपासून पाहिली जातील. त्यामध्ये शिथिलता देता येईल का तपासले पाहिजे. या सर्वांची माहिती घेऊन त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले.कोकणात गेल्यावर चाकरमान्यांना किती दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल या प्रश्नावर उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, आयसीएमआर व आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे तपासून पाहिली जातील. त्यामध्ये शिथिलता देता येईल का तपासले पाहिजे. या सर्वांची माहिती घेऊन त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com