मानेज इंटरनॅशनल स्कूल ( सीबीएसई ) शाळेचा दहावीचा निकाल ९७%
रत्नागिरी : येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई शाळेचा दहावीचा सलग चौथ्या तुकडीचा निकाल ९७ % लागला आहे.
हेत देसाई व अनुष्का यादव यांनी प्रत्येकी ९६.८०% मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर हुमेरा वांगडे हिने ९३.८०% मिळवून दुसरा तर श्राव्या सेनापती हिला ९२.६०% मिळून तिने तिसरा क्रमांक मिळविला. हेत देसाई हिने गणितात १००/१०० गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना उल्हास सप्रे, संजीव डोंगरे, अजित शेटके, मुनझ्झा मिरकर, जान्हवी पवार, आरुषी गावडे, नीलिमा कोटैया, शीला डिसोजा यांनी मार्गदर्शन केले. .
यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षक वर्गाचे तसेच मुख्याध्यापक उल्हास सप्रे, व्यवस्थापक प्रद्युम्न माने, कार्यकारी अध्यक्षा नेहा माने व प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्रजी माने यांनी अभिनंदन केले. या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास खात्यातील स्वायत्त अशा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला १८ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा फायदा विविध स्पर्धापरीक्षा आणि प्रवेशपरीक्षा यांच्यासाठी होतो.