रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजीव साळवी यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजीव साळवी यांचे आज काेराेनामुळे निधन झाले.गेले काही दिवस त्यांच्यावर शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या प्रकृतीतही चांगली सुधारणा झाली होती काल अचानक त्यांची प्रकृती बिघडत गेली व आज त्यांचे दुख:द निधन झाले.संजू साळवी फोटोग्राफी क्षेत्रात नाव कमावले होते रत्नागिरी बरोबर गोव्यातही त्यांचे फोटोग्राफी क्षेत्रात काम सुरू होते.मॉडेलिंग फोटोग्राफी क्षेत्रातही त्यांचे नाव होते.कॉलेज काळात त्यानी अनेक ऑर्केस्ट्रामधून मिमिक्री व गायन केले होते आज त्यांच्या निधनाचे वृत्त येताच सर्वांना धक्का बसला संजीव साळवी यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com