
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार ४९७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार ४९७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १९३ मृत्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ६० हजार ९२४ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४ हजार १८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २ लाख ६० हजार ९२४ रुग्णांपैकी १ लाख ४४ हजार ५०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १ लाख ५ हजार ६३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन १० हजार ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
www.konkantoday.com