बुधवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होताना दिसत आहे. येत्या बुधवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीचा होण्याची शक्यता असून दोन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
www.konkantoday.com