
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रथमच चिपळूण तालुक्याच्या दौर्यावर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या गुरूवार दि. १० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रथमच चिपळूण तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते अलोरे येथील कोयना धरण चौथ्या टप्प्याची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री ना. ठाकरे हे पुणे येथून हेलिकॉप्टरने कराड येथे येणार असून त्यानंतर ते अलोरे चौथ्या टप्प्याला भेट देऊन पाहणी करणार आहोत. चौथ्या टप्प्याची सद्यस्थिती, प्रगती आणि एकूणच प्रकल्पाचा आढावा ते घेणार आहेत. दौर्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी त्यानिमित्त सुरक्षेसह आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com