
गोवळकोटला जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठरलेल्या पेठमाप पुलासाठी आमदार शेखर निकम यांनी मिळवून दिला ७ कोटींचा निधी
चिपळूण शहरातील महाराष्ट्र हायस्कूल ते पेठमाप हा पुल उभारण्यात येणार असून या पुलासाठी अंदाजे १४ कोटी रुपये खर्च येणार असून चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी या पुलासाठी ७ कोटींचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून मिळवून दिला आहे. हा पुल झाल्यानंतर गोवळकोटकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून शहरात सध्या होणार्या बाजारपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. याशिवाय निकम यांनी देवरूख नगरपंचायतीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेखाली ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
www.konkantoday.com