
कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड – १९ असा उल्लेख
कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड – १९ असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.
www.konkantoday.com