
कंटेनर आणि क्वॉलिस अपघातातील जखमीचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर काल संगमेश्वरजवळ कंटेनर आणि क्वॉलिस या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात आचरा येथे जाणार्या पडवळ कुटुंबियांवर काळाने घाला घातला. या अपघातात कारमधील सीमा पडवळ या जागीच ठार झाल्या होत्या. त्यानंतर या अपघातात जगदीश पडवळ हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर डेरवण येेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोघे गंभीर जखमी आहेत.
www.konkantoday.com