
माझ्या मतदार संघातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या मागे मी भक्कमपणे उभा:- आमदार किरण सामंत
प्रत्येक जनतेचा प्रश्न सोडवने माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे
लांजा – पंचायत समिती लांजा यांच्या वतीने आयोजित महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळा 2025-26 अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध ग्रामपंचायतींनी राबविलेल्या उपक्रमांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या ग्रामपंचायतींना तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सामंत म्हणाले, “गावागावात शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविणे हीच खरी विकासाची गुरुकिल्ली आहे. महाआवास अभियानासारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात गृहनिर्माणाचा मोठा प्रश्न सोडविण्यास मदत होत आहे. यात गावांनी घेतलेली स्पर्धात्मक भागीदारी कौतुकास्पद आहे.”
यावेळी तालुकास्तरीय पुरस्कार राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वउत्कृष्टक. ग्रामपंचायत भांबेड, मध्ये प्रथम क्रमांक रून, दृतीय तृतीय ग्रामपंचायत गवाने, प्रभानवल्ली,
सर्वोत्कृष्ट घरकुल मध्ये शारदा शंकर बापरेकर,(साटवली),मनोहर जयराम गुरव (पन्हळे), संतोष आत्माराम कोटकर (सालपे) यांचा सन्मान करण्यात आला तसेच प्रधानमंत्री आवासमध्ये भांबेड गावाचा प्रथम क्रमांक, तसेच प्रथम क्रमांक ग्रामपंचायत झापडे, दृतीय क्रमांक ग्रामपंचायत कुरणे,
तृतीय क्रमांक ग्रामपंचायत वाघणगाव, तसेच वैयक्तिक मध्ये उषा हरिश्चंद्र गुरव (प्रभानवल्ली), वसंत सीताराम गाडे (आसगे), प्रकाश कृष्णा जाधव (कुरचूब) या ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजपकर, गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खामकर,पंचायत समितीचे, गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी, परेश खानविलकर, नायब तहसीलदार श्री.गोसावी, कृषी अधिकारी संतोष म्हात्रे, राजू नेवाळकर, सुजित आंबेकर, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.