सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत शिवसेनेचा टोला
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेकडून सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली आहे. सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत असा टोला शिवसेनेने लगावला आहे. प्रवचने देण्यापेक्षा एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे. सोबतच आरएसएसने केलेल्या कामामुळेच धारावी करोनामुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या भाजपा नेत्यांवरही टीका केली आहे.
www.konkantoday.com