
सर्वसामान्यांवर कारवाई, अवजड वाहतुकीकडे दुर्लक्ष
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करत उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडाची वसुली करत आहे. मात्र असे असताना जयगड-निवळी मार्गावर सुरू असलेल्या अवजड वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अवजड वाहतुकीची दखल घेत त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com