
मिर्या किनारी अडकलेल्या बसरा स्टार जहाजा पुढे दिवसेंदिवस समस्यांमध्ये वाढ
निसर्ग वादळात मिर्यावर किनार्यावर येवून रूतलेल्या बसरा स्टार जहाजाच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. लाटांच्या तडाख्याने जहाज खडकावर आदळून सुमारे २० टक्केहून अधिक जहाज नादुरूस्त झाले आहे. जहाजाच्या तळातून पाणी आत येत असल्याने धोका अधिक वाढला आहे. जहाज दुरूस्तीसह बाहेर काढण्यासाठी कोट्यावधींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे जहाज मालकही अडचणीत सापडले आहेत. तर दुसरीकडे स्थानिकांनी जहाज लवकर हटविण्याची मागणी केली आहे. बंदर विभागाने जहाज मालकांना नोटीस बजावली असून जहाज केव्हा किनार्यावरून काढणार याची माहिती देण्याची सूचना केली आहे.
www.konkantoday.com