
प्र. ल. मयेकर नाट्य लेखक स्पर्धेचा निकाल जाहीर
श्रीरंग संस्था रत्नागिरी आयोजित किरण साळवी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या प्र. ल. मयेकर स्मृती नाट्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कुर्डुवाडी सोलापूर येथील विनय दहीवाळ यांच्या अनाघात संहितेस प्रथम, कुडाळ येथील केदार देसाई यांच्या तुझ्यात जीव रंगला संहितेला द्वितीय, पुणे येथील माधव जोगळेकर यांच्या मरे एक त्याचा या संहितेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. इरफान मुजावर यांच्या पुर्णविराम, संजय रणदिवे यांच्या कलापुरूष या संहितांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील नाट्यलेखक डॉ. समीर मोने यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सलग तेराव्या वर्षी श्रीरंग संस्थेमार्फत आयोजित केलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ४६ लेखक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाची तारीख आयोजकांमार्फत लवकरच जाहीर केली जाणार आहे.
konkantoday.com




