
माजी जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत देशपांडे यांचा रिफायनरी ला पाठिंबा
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि केंद्र शासनाकडून सौंदळ रेल्वे स्थानकांच्या साठी प्रयत्न करून हेच स्थानक उभे करण्यात मोलाचा वाटा असलेले शिक्षण महर्षी चंदूभाई देशपांडे यांनी रिफायनरी प्रकल्प
राजापूर येथे व्हावा आणि तालुक्यासह जिल्ह्याच्या आर्थिक कायापालट व्हावा अशी भूमिका घेऊन रिफायनरी च्या समर्थनात लढ्यात उडी घेतली आहे याबाबतचे सविस्तर निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे हा प्रकल्प कोकणातच नव्हे तर राज्याला संजीवनी देणारा ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले
www.konkantoday.com