
खेडमध्ये १२१ जणांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल
खेडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र काही नागरिकांकडून त्याचा अवलंब होताना दिसत नसून खेड नगरपरिषदेने मास्क न वापरणार्या या १२१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
www.konkantoday.com