
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पैकी एका व्यक्तीचा स्वॅब निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला
रत्नागिरी तालुक्यातील एका प्रसिद्ध खासगी कंपनीतील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यापैकी एका व्यक्तीचा स्वॅब निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाल्यामुळे गोंधळ उडाला. आरोग्य विभागाने मध्यरात्री त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.रत्नागिरी एमआयडीसीतील कंपनीत मागील आठवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळला होता. या कर्मचाऱ्यासोबत काम करणाऱ्या आठ ते नऊ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांचा स्वॅब घेण्यात आला सुरुवातीला सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले. मात्र एका कर्मचाऱ्याचा अहवाल संशयास्पद वाटल्याने त्याची पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com