परिवहन विभागाच्या भरारी पथकाने आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा आंदोलन- सतीश मोरे
चिपळूण (प्रतिनिधी): कोरोना परिस्थितीमुळे गेल्या चार- पाच महिन्यांपासून सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना गेली आठवडाभर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पथकाने आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा भाजपचे माजी चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश मोरे यांनी देत या विभागाच्या भरारी पथकाच्यात हिम्मत असेल तर मुंबई- गोवा महामार्गावरील ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करून दाखवावी नाही तर आम्ही गाड्या पकडून देतो असे आव्हानच या अधिकाऱ्यांना दिले आहे.
www.konkantoday.com