
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम,जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचाजगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथड्या भरून वाहताहेत.. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी (७ मीटर) ओलांडली असून, सध्या तिची पाणी पातळी ७.२० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरलं आहे. जगबुडी नदीकाठच्या रहिवाशांना आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




