आ. राजन साळवी यांच्या निधीतून आयसीयू रूग्णवाहिका मंजूर
कोविडच्या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी स्थानिक विकास निधीतून राजापूर मतदारसंघासाठी प्रस्तावित केलेल्या आयसीयू रूग्णवाहिकेला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. यासाठी २२ लाख रुपये रक्कम मंजूर झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या व होणारी गैरसोय लक्षात घेता आ. साळवी यांनी यापूर्वीच कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिवप्रतिष्ठान संस्थेची रूग्णवाहिका राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी सुपूर्द केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोविड रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिका उपलब्ध होण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.
www.konkantoday.com