आंबा घाटात १२ मार्च रोजी सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली,खुनाचा प्रकार
दोघांना अटक

आंबा घाटात १२ मार्च रोजी सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली आहे हा मृतदेह लांजा देवराई येथील प्रकाश भोवड याचा असून त्याच्या खुनाची उकल करण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी रुपेश दयानंद कोत्रे आणि सतीश पालये ( लांजा ) यांना अटक करण्यात आली आहे.४महिन्यांपूर्वी हा खुन झाला हाेता
शर्टावरील टेलर च्या लोगो वरुन पाेलिस खुनी संशयितांपर्यंत पाेहचले
लांजा देवराई येथील प्रकाश भोवड याचा खून झाल्याचे तपासात उघड झाले व हा खून
रुपेश दयानंद कोत्रे आणि सतीश पालये ( लांजा ) यां दाेघानी केल्याने त्याना अटक करण्यात आली आहे.४महिन्यांपूर्वी या तिघाची जेवणाची बैठक जमली असता त्याचे भांडण झाले त्यात झालेल्या भांडणातुन आराेपीनी डाेक्यात दांडा मारुन प्रकाश यांचा खून करुन ते प्रेत आंबा घाटात टाकले हाेते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button