शिक्षकांनी केलेल्या महाराष्ट्र दर्शनची बिले पंचायत समितीच्या लेखा विभागाने नाकारल्याने शिक्षकांच्यात खळबळ
महाराष्ट्र दर्शन या योजनेतून राज्यातील शिक्षकांना आपल्या कुटुंबियासह महाराष्ट्रात प्रवास करता येतो. त्याचा प्रवास खर्च रेल्वे आणि एसटीच्या तिकिटात निश्चित करण्यात आला आहे. शिक्षक जर स्वतःची गाडी घेवून गेला तर त्याला रेल्वे आणि एसटीच्या तिकिट दरात खर्च दिला जातो. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील काही शिक्षकांनी गोंदिया, वर्धा आदी लांबची ठिकाणे निवडली. प्रवास न करता बिले दाखवली .स्वतःची गाडी नसल्याने ट्रॅव्हल एजन्सीची जीएसटी नसलेली बिले सादर केली. मात्र या बिलाबाबत संशय आल्याने पंचायत समितीच्या लेखा विभागाने ही बिले नाकारली आहेत. त्यामुळे आता शिक्षकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या सभेत उपसभापतींनी याबाबत विचारणा केल्याने हा विषय परत एकदा चर्चेला आला आहे.
www.konkantoday.com