शालेय पोषण आहारासाठीचे हजारो टन धान्य चिपळुणात सडलेल्या अवस्थेत सापडले
चिपळुन येथील शालेय पोषण आहारात लहान मुलांसाठी दिले जाणारे धान्य सडलेल्या अवस्थेत गोडाऊनमध्ये सापडण्याची घटना चिपळूण खडपोली एमआयडीसीत घडली आहे.या गोडाऊनमधून दुर्गंधी सुटल्याने चिपळूणच्या सभापतींनी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून या गोडाऊनला भेट दिली त्यावेळी गोडाऊन परिसरात दुर्गंधी सुटली होती.प्रत्यक्ष पाहणी केली असता हजारो टन धान्य सडलेल्या अवस्थेत सापडले.शालेय पोषण आहाराच्या पॅकिंगसह ठेका बीड येथील बचत गटांकडे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.असे निकृष्ट दर्जाचे धान्य लहान मुलांना देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त संभावना आहे.
www.konkantoday.com