राज्यात काल सर्वाधिक काेराेनारुग्णांची नोंद ,नव्याने ७८६२ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात काल सर्वाधिक काराेना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल नव्याने ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण अॅक्टीव ९५,६४७ रुग्ण झाले आहेत. तर दुसरीकडे काल ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण १,३२,६२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२% एवढे झाले आहे.
राज्यात काल २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२,५३,९७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,३८,४६१ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button