
रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन
कोकण परिसरात दुर्मिळ असलेल्या ब्लॅक पॅंथरचे संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे भागातील नागरिकांना दर्शन झाल्याचे वृत्त आहे.याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ सध्या फिरत आहे.मात्र काही ग्रामस्थांच्या मते हा व्हिडिओ जुना असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. वनविभागाने या ब्लॅक पँथरच्या वावरा बाबत दुजोरा दिला आहे.याआधी गुहागरमध्ये ब्लॅक पॅंथर विहिरीत पडून मृत झाला होता .त्यामुळे या कोकण परिसरात ब्लॅक पॅंथर असावा याला वनविभागाने दुजोरा दिला असून त्यांच्या हालचालीवर लक्ष करण्यासाठी लवकरच कॅमेरा बसवण्यात येणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com