ब्रिटीश काळातील शास्त्री पुलाकडे अद्यापही दुर्लक्ष, वाहतूक धोकादायक
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वरनजिक असणारा शास्त्री पुल आता वाहतुकीसाठी दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. ब्रिटीश काळात बांधलेल्या या पुलाला ८० वर्षे झाली असून पुल आता धोकादायक झाला आहे. सध्या या पुलाच्या बाजूचे रेलिंगही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे जर अतिवृष्टीमुळे पुरासारखी परिस्थिती येथे निर्माण झाली तर या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com