
देवरूखमध्ये नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळले
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथे निसर्गप्रेमी आणि पर्यावरणाचे अभ्यास करणारे प्रतिक मोरे यांना नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. मोरे यांच्या घराजवळ असलेल्या झाडावर हे फुलपाखरू त्यांना आढळले. मोरे यांनी आपल्या घराजवळ खास फुलपाखरांसाठी छोटे उद्यान बनवले असून त्यात हे फुलपाखरू आढळले असून त्याचे शास्त्रीय नाव सह्याद्री ब्ल्यू ऑकलीफ असे आहे.
www.konkantoday.com