ठेकेदाराकडुन ते सडलेले धान्य रातोरात गायब करण्याचा प्रयत्न,ग्रामस्थानी राेखले
खडपोली एमआयडीसीतील एका कंपनीत अंगणवाडीतील मुलांना पुरवण्यात येणारे सडलेल्या धान्याचा साठा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी उघड केले. होते. सभापती धनश्री शिंदे यांनीही भेट दिली होती. दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत महसूल अथवा कुठल्याही विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले नाहीत. रात्री ठेकेदाराने बारा ट्रक या ठिकाणी लावून हे धान्य रातोरात हलविण्याचा प्रयत्न केला. यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. त्यात व्यवस्थापकाने काय करायचे ते करा, अशी भूमिका घेतल्यानंतर वातावरण अधिकच संतप्त झाले. चिपळूण शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सपकाळ यांनीही कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी व्यवस्थापकाला धारेवर धरण्यात आले. व्यवस्थापकाने ठेकेदाराने धान्य हलविण्यास सांगितल्याची कबुली दिली. यानंतर या व्यवस्थापकाला घेऊन पोलीस स्थानकात आणण्यात आले.पाेलिसानी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करून घेतली नाही दरम्यान आमदार शेखर निकम आज घटनास्थळी भेट देणार आहेत.
www.konkantoday.com