चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवा बाबत धोरण शासनाने वेळीच जाहीर करणे आवश्यक
पुढील महिन्यात येणार्या गणेशोत्सवाबाबत शासनाने अद्यापही उच्च पातळीवर निर्णय घेतला नसल्याची माहिती नुकतेच रत्नागिरीच्या दौर्यावर आलेले गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
याआधी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सवाबाबत निर्णय घेण्याबाबत दोन्ही जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली होती. याबाबत सिंधुदुर्गची प्राथमिक बैठक पार पडली असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. रत्नागिरीत अद्याप बैठक झाली नसल्याचे कळत आहे. गणेशोत्सवाच्या बाबतीत शासनाने लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने येत असतात. त्यातील काही चाकरमानी सध्या कोकणात असले तरी मुंबईहून येणार्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असणार आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणते निकष लावले जाणार आहेत याची माहिती आधीच कळणे जरूरीचे आहे. अन्यथा परत एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे कोकणात येणार्या चाकरमान्यांना जो त्रास झाला तो परत होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com