
कोकणातील वादळग्रस्त भागातील फळबागांच्या पुर्नलागवडीसाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात फळबागायतीचे मोठे नुकसान झाले असून बहुतेक ठिकाणी फळबागा नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता रोजगार हमी योजनेंतर्गत फळबागांची पुर्नलागवड करण्यात येणार आहे. या वादळात कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू, नारळ, सुपारी बागा पूर्णपणे नष्ट होवून अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाला आहे. या फळबागांच्या पुर्नलागवडीसाठी नियोजन विभागाने ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
www.konkantoday.com