
अभिनेता अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण
बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची
कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.त्यांना उपचारासाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .यानंतर आता अभिषेक
बच्चनलासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बच्चनने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. अभिषेकने ट्विटरवर म्हटलं की,वडिलांसह माझीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे असून रुग्णालयात
दाखल झालो आहेत. आम्ही आवश्यक त्या सर्वांना याची माहिती दिली असून कुटुंबिय आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे.कोणीही अस्वस्थ होऊ नका आणि शांत रहा असं आवाहन अभिषेकने केलं आहे.