अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निर्णयामुळे आता विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष
महाराष्ट्र शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यात याव्यात असा निर्णय दिल्याने विद्यार्थी व पालकांच्यात संघर्षाचे वातावरण असताना आता या निर्णयावरून विद्यार्थी संघटनांमध्ये देखील राजकारण सुरू झाले आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला युवा सेना, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, एनएसयुआय आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तर परीक्षा घेण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील पक्षातील संघर्ष आता विद्यार्थी संघटनांपर्यंत येवून पोहोचला आहे.
www.konkantoday.com