
सरकारच्या ”मिशन बिगीन अगेन”नुसारमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट्स सुरू हाेणार
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन घोषित केल्यानंतर पर्यटन महामंडळाची पर्यटक निवासस्थाने बंद होती बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता पुन्हा खुली होत आहेत. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे
लॉकडाउन घोषित केल्यानंतर पर्यटन महामंडळाची पर्यटक निवासस्थाने बंद होती. मात्र, राज्य सरकारच्या ”मिशन बिगीन अगेन”नुसार पुन्हा हॉटेल्स आणि लॉज सुरु होत आहेत. तसेच, काही अटी-शर्तींवर रिसॉर्ट्सही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यातील माळशेज, माथेरान, महाबळेश्वर, तारकर्ली, गणपतीपुळेसह इतर रिसॉर्ट्स सुरू होत आहेत.
www.konkantoday.com