
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने अथर्व शीर्ष पठणाची परंपरा पाच महिलांच्या उपस्थितीत सुरू ठेवली
यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट असलं तरी भाविकांचा उत्साह, श्रद्धा मात्र कायम आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा असतो. यावर्षीही ही प्रथा कायम आहे. यंदाही ‘ओम नमस्ते गणपतये…’चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा, यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.
www.konkantoday.com