रत्नसिंधू कलामंच तर्फे ऑनलाईन युवा वक्ता स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नसिंधू कोकण विभाग कलामंच महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय युवा वक्ता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वयोगट 13 ते 18 गट क्र. 1 व वयोगट 19 ते 30 गट क्र. 2 अश्या दोन गटात घेतली जाणार आहे.

गट क्र. 1 साठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 3000 रु. , 2000 रु. व 1000 रु. अशी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहेत. तसेच गट क्र. 2 साठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी 5000 रु. 3000रु. व 2000 रु. अशी भरघोस रक्कम ठेवली आहे. गट क्र. 1 साठी विषय असे आहेत. थोर साहित्यिक आण्णा भाऊ साठे, चला स्वप्नांच्या गावी जाऊ, वाचन एक संस्कार मनाचा, भारत माझा देश आहे व जगाचा पोशिंदा शेतकरी उत्तेजनार्थ 500 रु. पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत.
गट क्र. 2 साठी विषय आहेत संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आजची तरुण पिढी दशा व दिशा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माझा देश महासत्ता होणारच व माणसे पेरायला लागू असे आहेत. उत्तेजनार्थ पाच बक्षिसे रक्कम 1000 रु. देण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील सहभागासाठी प्रवेश फी गट क्र. 1 साठी 100 रु. तर गट क्र. 2 साठी 300 रु. एवढी नाममात्र ठेवण्यात आली आहे. अधिक माहिती साठी व नाव नोंदणी साठी 9403622003 किंवा 7840975078 या व्हाट्सअप नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन रत्नसिंधू कलामंचतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button