
बंदी असताना मच्छिमारी करणार्या एलईडी पर्ससीननेटवर कारवाई करा
जिल्हाधिकार्यांनी पर्ससीन मच्छिमार नौकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही मत्स्य विभाग पर्ससीन, अनधिकृत एलईडी नौका विरोधात कारवाई करत नसल्यामुळे मिरकरवाडा बंदर ट्रॉलिंग लॉंच मालक व मच्छिमार असोसिएशनचे अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांना निवेदन दिले.
यावेळी पारंपारिक मच्छिमार आप्पा वांदरकर म्हणाले की, एलईडी व पर्ससीन नौकांना मासेमारीसाठी बंदी आहे. तरीही कोकण किनारपट्टीवर सुमारे ६०० ते ७०० अनधिकृत नौकांद्वारे मासेमारी सुरू आहे.
www.konkantoday.com