पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबेचा पोलिसांनी केला एन्काउटर
पोलिसांची हत्या करणारा विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. या अपघातादरम्यान कार उलटी झाली. दरम्यान पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउटर केला.
दुर्घटनेचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता. पथकातील एका पोलीसानं विकास दुबेवर गोळीबार केला.
सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार विकास दुबे एन्काउंटरदरम्यान गंभीर जखमी झाला होता.
त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला
www.konkantoday.com