चिपळूण औद्योगिक वसाहतीतील जे. के. फाईल्स कंपनीतील कामगारांनी १०० टक्के पगारासाठी संप पुकारला
चिपळूण जवळील गाणेखडपोली येथील जे. के. फाईल ऍण्ड टुल्स आणि जे. के. तलाबोल या कंपनीतील १६० कामगारांनी १०० टक्के पगारासाठी संप पुकारला असून ते कालपासून संपावर गेले आहेत. सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने त्याचा फटका अनेक औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. या कंपनीत तयार होणार्या फाईल्स ड्रील्स तसेच इतर उत्पादने परदेशात पाठवली जातात. मात्र सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे परदेशात माल जाऊ शकत नसल्याने कंपनीच्या मालाला मागणी नसल्याने कंपनीच्या व्यवस्थापकांनी कर्मचार्यांना ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या कामगारांना १०० टक्के पगार पाहिजे असल्याने ते संपावर गेले आहेत.
www.konkantoday.com