
चिपळूणातील व्यापार्यांनी रेटा लावल्याने चिपळुणातील बाजारपेठ आता दररोज ९ ते ५ या वेळेत सुरू राहणार
चिपळूणमधील व्यापारी संघटना, व्यापारी लोकप्रतिनिधी यांनी दाखविलेल्या रेट्यामुळे चिपळूण बाजारपेठ उद्यापासून सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी परवानगी दिली आहे. यामध्ये काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न करणार्या व्यापार्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
यामध्ये प्रशासनाने घातलेल्या अटींमध्ये सकाळी ९ ते सायं. ५ यावेळेत पूर्ण बाजारपेठ उघडी राहिल, सोमवारी पूर्ण बाजारपेठ १०० टक्के बंद राहिल. उद्यापासून वाईन शॉपही सुरू राहतील. हॉटेलमधून पार्सल व होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकण्यास मनाई करण्यात आली आहे. चिकन, मटण, मच्छि विक्री दुकाने बुधवार, शुक्रवार व रविवार सुरू राहणार आहेत. व्यापार्यांनी मास्क, टेंपरेचर मीटर, सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. ग्र्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे, यासाठी व्यापार्यांनी उपाययोजना कराव्यात अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याबाबत काल व्यापारी यांची खा. विनायक राऊत व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यावेळी खा. राऊत यांनी व्यापार्यांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे व्यापार्यांच्यावतीने शिरिष काटकर यांनी खा. विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आ. शेखर निकम, माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांचेसह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व प्रांताधिकारी प्रविण पवार यांचे आभार मानले आहेत. रत्नागिरीतील व्यापारी संघटना आपला रेटा दाखवण्यास कमी पडल्याचे दिसत आहे. कारण रत्नागिरी शहरात फक्त एक दिवस आड दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली आहे.
www.konkantoday.com