लाॅकडाऊनमुळे आधिच मेताकुटीस आलेल्या वाहतूक व्यवसायांकाकडून आरटीओच्या भरारी पथकाकडून चिपळुणात मेमो फाडण्याचे काम सुरू, वाहनचालकांच्यात तीव्र नाराजी

लाॅकडाऊनमुळे वाहतूक व्यवसायीकांच्यावर गेले तीन महिने उपासमारीची वेळ असतानाच गेला आठवडाभर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भरारी पथक चिपळूणांत ठाण मांडून बसलेले आहे. वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. वाहनांचे फीटनेस नुतनीकरणाचे काम बंद आहे. त्या अधिका-यांना वेळच वेळ आहे. वाहनांनी टॅक्स भरला नाही म्हणून मेमो फाडणे चालु आहे.
वाहनांचे फीटनेस नुतनीकरण करण्याचे काम बंद असण्याचे कारण, तपासणी अधिका-यांचा , फीटनेस नुतनीकरण करावयास आलेल्या वाहन धारकांशी संपर्क येण्याची शक्यता व त्या मुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती. थोडक्यात,अधिका-यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी फीटनेस नुतनीकरणाचे काम बंद आहे. भरारी पथकाला, रस्त्यावर वाहने अडवून, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करते समयी, वाहन चालकाशी संपर्क येणारच व रस्त्यावर या कालावधीत वावरणारा वाहन चालक, कोरोनाचा वाहक असु शकतो. त्या मुळे वाहन तपासणी अधिका-यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
वाहनांचे फीटनेस नुतनीकरण करण्याचे काम बंद असल्याने, ती वाहने वाहतुकीसाठी वापरणे, वाहन चालक, वाहनाने प्रवास करणारे प्रवासी व रस्त्यावरील इतर वाहने, इतर वाहनातील प्रवासी व रस्त्यावरील पादचा-यांना धोका संभवतो. वैध फीटनेस नसेल तर, वाहनाचे कुठलेच कागदपत्र वैध होऊ शकत नाही असा कायदा आहे.
मार्च अखेरपासून बहुतांश वाहने बंद आहेत. प्रवासी बसेस्, मालवाहतूक करणारी छोटी-मोठी वाहने, रिक्षा बंद आहेत. या वाहनांवर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या तीन महिन्यांचा वाहने वापरली नसल्याने, त्यांचा टॅक्स माफ करणेत यावा अशी मागणी वाहन मालकांनी सरकारकडे केली आहे. त्याबाबत अद्याप कोणतीही दिलासादायक घोषणा सरकारकडून झालेली नाही. वाहन मालक त्या कर माफीच्या घोषणेची आतुरतेने वाट पहात असताना, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरीने भरारी पथकाला सक्रीय केले आहे व वाहन धारकांना मेमो फाडून त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. या कालावधीतील भरारी पथकाच्या कारवाई बद्दल वाहन धारकांमधे अतिशय संतापाची भावना आहे. वाहन चालु असो अथवा बंद असो. वाहनाचा टॅक्स दाम दुप्पट पेनल्टी लाऊन, वसूल केला जातो. कर चुकवणे हा विषय कुठल्याही कायद्यात अंतर्भूत नाही. असे असतांनाही हा जुलूम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी करीत आहेत. हा जुलूम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने थांबवावा अन्यथा लाॅक डाऊन काळात जर अधिकारी मुजोरपणा करीत असतील तर त्यांच्या मुजोरपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी वाहन चालक/मालक संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर ऊतरेल व होणा-या परीणामांची सर्व जबाबदारी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची असेल असे पिडीत वाहनधारकांनी जाहीर केले आहे.
एका फींगर टीप वर, वाहनांच्या सर्व कागदपत्रांची वैधता दिसत असतानाही, ऑनलाईन नोंदणी असलेल्या वाहनांची, तपासणी कामी कागदपत्रे मागण्यात येतात. जे कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर अतिशय घातक आहे.
मेमो इश्यु झाल्यापासून, ७ दिवसांच्या आत, वाहन चालकाला वैध कागदपत्रे, वाहनासोबत न बाळगल्याने जो मेमो देण्यात येतो तो, मिटविण्यासाठी रत्नागिरी येथे जाणे आहे. मेमो मिटविण्यासाठी रत्नागिरी कार्यालयांत गर्दी उसळली तर, सोशल डीस्टंन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. ज्या मुळे कार्यालयांत काम करणारे अधिकारी, कारकून व कर्मचा-यांना कोरोनाचा धोका संभवतो व कदाचित ते कोरोनाबाधित असतील तर, वाहन चालक/मालकांच्या आरोग्याला धोका संभवतो. त्यामुळे रत्नागिरी कार्यालयांत जाणे ही गोष्ट लाॅक डाऊन काळात, वाहन चालक/मालकाला अशक्यप्राय आहे.आरटीओकडून चालू असलेल्या या प्रकाराची गंभीर दखल लोकप्रतिनिधी व प्रशासनाने घेणे आवश्यक आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button