रेल्वेचं कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येणार नाही-रेल्वेमंत्री पीयूष गोयल
काही दिवसांपासून रेल्वेच्या खासगीकरणाबाबत चर्चांना उधाण आलं होतं. तसंच खासगी ट्रेन चालवण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर रेल्वेच्या खासगीकरणाबाबत अधिकच चर्चा सुरू होत्या. यादरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोठं वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वेचं कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. खासगी भागीदारीतून १०९ मार्गांवर १५१ अतिरिक्त अत्याधुनिक रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. याचा सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
www.konkantoday.com