राज्यात ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेने पुकारलेल्या युद्धाला आता चांगलं यश येताना दिसून आहे. नवे रूग्ण जरी मिळत असले तरी आता कोरोना पेशंटला देण्यात येणाऱ्या डिस्चार्जच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०६ टक्के एवढे झाले असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात काल ४ हजार ६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
बुधवारी कोरोनाच्या ६ हजार ६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com